दहावी,बारावी, पदवीरांसाठी केंद्रीय नोकरीची संधी! अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु 

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे विविध पदांसाठी एकूण २०४९ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ मार्च देण्यात आली आहे. 

दहावी,बारावी, पदवीरांसाठी केंद्रीय नोकरीची संधी! अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्टाफ सिलेक्शन कमिशनने  विविध पदांसाठी (Staff Selection Commission) भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही दहावी, बारावी किंवा पदवीधर असाल तर ही संधी गमावू नका. कारण केंद्र सरकारची नोकरी (Central Govt Jobs) करण्याची सुर्वणसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे ही भरती (Recruitment process) केंद्र सरकारद्वारे राबवली जाणार नसून स्टाफ सिलेक्शनने यासाठी अर्ज मागवले आहेत.  

आयोगाकडून त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले  जात आहेत. त्यासाठी तुम्हाला स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेत एकूण २०४९ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ मार्च देण्यात आली आहे. 

लॅब अटेंडेंट, लेडी मेडिकल अटेंडेंट, मेडिकल अटेंडेंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फील्ड मन , डेप्युटी रेंजर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, अकाउंटेंट, असिस्टेंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर अशा विविध पदांवर भरती प्रकिया पार पडणार आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत बाबत सविस्तर माहिती पाहाण्यासाठी अधिकृत संकेतस्थाळावर जाऊन जाहिरात पाहावी. 

वरिल सर्व पदांसाठी दहावी, बारावी, पदवीधर किंवा त्यावरील समतुल्य शिक्षण उत्तीर्ण आवश्यक आहे. यासाटी १ जानेवारी २०२४ रोजी १८ पुर्ण असावे, ही मर्यादा ४२ वर्षापर्यंत देण्यात आली आहे. SC/ST साठी ५ वर्षे सुट तर OBC ला ३ वर्षे सुट देण्यात आली आहे. यासाठी १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आला आहे.