NCERT मध्ये नोकरीची मोठी संधी ; नो परीक्षा,थेट मुलाखतीद्वारे निवड 

या रिक्त पदांच्या भरण्यात येणाऱ्या जागांचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

NCERT मध्ये नोकरीची मोठी संधी ; नो परीक्षा,थेट मुलाखतीद्वारे निवड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. NCERT मध्ये विविध पदांच्या 65 जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे.  PAB आणि PAC प्रकल्पांतर्गत (PAB and PAC projects) ही सर्व पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराची निवड (Direct selection of candidate on the basis of interview) केली जाणार आहे. या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 1 मार्च 2025 पर्यंत केली जाईल. 

या भरतीसाठी, NCERT ने वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ सल्लागार शैक्षणिक, AI तज्ञ, वरिष्ठ प्रोग्रामर यांसह विविध पदांसाठी 65 रिक्त जागांवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ncert.nic.in द्वारे अर्ज करू शकतात. सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

NCERT च्या या भरतीद्वारे एकूण 65 पदांची भरती होणार असून येत्या 18 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. NCERT च्या या पदांवर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. त्यावेळी उमेदवाराकडे कागदपत्रांसह सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक सल्लागार पदासाठी दरमहा 75 हजार रुपये वेतन आहे. तर तांत्रिक सल्लागार पदाचे वेतन दरमहा ६० हजार रुपये आहे. सोशल मीडिया मॅनेजरचा पगार दरमहा 45 हजार  रुपये आहे. कॉपी एडिटरचा पगार दरमहा 35 हजार रुपये आहे. वेतन विविध पदांनुसार असणार आहे.