परीक्षा विभागच दोषी प्राध्यापकांचा बचाव करतंय ; युनासनेचा विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप

पुनर्मूल्यांकनामध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असल्यास दोषी प्राध्यापकांवर कार्यवाई करण्याची तरतूद आहे. पण अद्याप एकाही प्राध्यापकावर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई झाली नाही.

परीक्षा विभागच दोषी प्राध्यापकांचा बचाव करतंय ; युनासनेचा विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुनर्मूल्यांकनामध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असल्यास उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकावर (Supplementary examination fee to students) कारवाई करण्याची तरतूद आहे. पण हा नियम आल्यापासून एकादाही संबंधित प्राध्यापकांवर हलगर्जीपणा केल्यामूळे कारवाई झाली नसल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत समोर आले आहे.त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील (Sant Gadgebaba Amravati University) परीक्षा विभागच दोषी प्राध्यापकांचा बचाव करत आहे, असा आरोप युवा सेना (उ.बा.ठा.) शहर प्रमुख योगेश सोळंके (Yogesh Solanke) यांनी केला आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठांमध्ये उत्तरपत्रिका मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचे शुल्क परत करण्याबाबत विद्यार्थ्यी तक्रारी करत आहेत. तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर देखील त्यांना गंभीरतेने घेतले जात नाही,असा आरोपही युवासेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आक्रमक होत युवासेनेने आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाला जब विचारला.  

यावेळी विद्यार्थी सेना (उ.बा.ठा.) शहर प्रमुख योगेश सोळंके यांनी प्राध्यापक मूल्यांकन करताना हलगर्जी बाळगतात त्यामुळे विद्यार्थ्यांना ०, १, २ असे गुण मिळतात व नंतर पुनर्मुल्यांकनामध्ये त्याच्या गुणांमध्ये २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व आर्थिक भूदंड सोसावा लागत असल्याचे युवासेनेने निदर्शनास आणून दिले. 

या सोबतच पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण केलेल्या पण पुरवणी परीक्षेचा अर्ज अगोदर भरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमाप्रमाणे शुल्क परत केले  जाते. पण गेल्या दहा वर्षात विद्यापीठाने फक्त १ हजार ६११ विद्यार्थ्यांना हे शुल्क परत केले आहे,अशी माहिती समोर ठेवली . फक्त शैक्षणिक वर्ष २३-२४ मध्येच विद्यापीठात एकूण ८ लाख विद्यार्थी शिकत आहे. विद्यापीठाचा निकाल हा एका परीक्षा सत्रात सरासरी  ७० टक्के एवढा लागतो. तब्बल ३० टक्के विद्यार्थी म्हणजेच २.४० लाख विद्यार्थी दरवर्षी अनुत्तीर्ण होतात. विद्यापीठाकडून गेल्या दहा वर्षात विद्यार्थ्यांना फक्त ११.२७ लाख रुपये परत करण्यात आले आहेत. 

विद्यापीठाने अर्ज सादर करणारी व शुल्क परतावा करणारी व्यवस्था ही ऑनलाइन करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना परत मिळू शकतील. या आशयाचे निवेदन विद्यार्थी सेना शहर प्रमुख योगेश सोळंके यांनी विद्यापीठाला दिले आहे.तसेच लवकरात लवकर यावर तोडगा न काढल्यास विद्यार्थी सेना विद्यापीठात शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे.