नव्या धोरणामुळे बंदिस्त शिक्षण खुले होणार : डॉ. नितीन करमळकर यांचे मत

'अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' (एबीआरएसएम) यांच्यामार्फत सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते.

नव्या धोरणामुळे बंदिस्त शिक्षण खुले होणार : डॉ. नितीन करमळकर यांचे मत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीमुळे बंदिस्त असलेले शिक्षण (Education) आता खऱ्या अर्थाने खुले होणार आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना हवी असणारी सर्व कौशल्य आत्मसात करता येतील. त्यासाठी सर्व प्राध्यापकांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडावे. कारण या विद्यार्थ्यांमुळेच पुढे सशक्त व सुदृढ समाज निर्माण होणार आहे, असे मत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (Dr. Nitin Karmalkar) यांनी व्यक्त केले.

'अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' (एबीआरएसएम) यांच्यामार्फत सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळींच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, डॉ. मनोहर सानप, डॉ. महेश अबाळे व डॉ. ए. पी कुलकर्णी, एबीआरएसएम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. डी. बी. पवार उपस्थित होते.

विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंचे नाव ठेवले गुलदस्त्यात ; व्यवस्थापन परिषदेत निर्णय नाही

करमळकर यांनी गुरुचे माहात्म्य सांगून नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षकांना प्रबोधन केले व भारतीय ज्ञान परंपरा व परंपरेचे आजच्या काळातील शैक्षणिक महत्व ह्या विषयावर उद्बोधन केले. कार्यक्रमात डॉ. महेश अबाळे व डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी संघटनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी एबीआरएसएम संघटनेच्या एसपी महाविद्यालयाच्या स्थानिक  कार्यकारिणी मंडळाचे डॉ. चेतन भुजबळ, कर्वे स्त्री शिक्षण संस्था कार्यकारिणी मंडळाचे डॉ. सुभाष पवार, वाडिया महाविद्यालय कार्यकारिणी मंडळाचे डॉ. मनोहर सानप, डॉ. अनिल शिरोळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी डॉ. भारती बालटे यांनी संस्कृत भाषेतील सरस्वती वंदना सादर केली. डॉ. रचना ठोंबरे यांनी संघटनेचे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर उपासनी यांनी केले. तर डॉ. नीता मोहिते यांनी आभार मानले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD