शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू

उमेदवारांना २१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार

शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची प्रवेश पीएचडी प्रवेश प्रक्रिया (Shivaji University Admission PhD Admission Process) सुरू झाली असून उमेदवारांना २१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक तसेच परिक्षेचे हॉल तिकीट (Exam hall ticket) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही. एन. शिंदे (Registrar Dr.V. N. Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी पीएचडी प्रवेशासाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष 2023- 24 या पीएचडी ॲडमिशन लिंकला भेट द्यावी. ऑनलाइन संकेतस्थळ २१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १० जानेवारी २०२४ पर्यंत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षण पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या 350 जागाच का भरणार ?

-----

पीएच. डी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : www.unishivaji.ac.in 

अर्ज करण्याचा कालावधी : २१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ 

संकेतस्थळावरील कोणत्या लिंकला  भेट द्यावी  : शैक्षणिक वर्ष 2023- 24 या पीएचडी ॲडमिशन