मुलींच्या शैक्षणिक नोंदणीचा टक्का ३१ टक्यांनी वाढला ; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान 

मुलींच्या शैक्षणिक नोंदणीचा टक्का ३१ टक्यांनी वाढला ; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ(ncrease in number of girls)झालाची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष  २०१४-१५ ते २०२१-२०२२ या कालावधीत शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुलींच्या नोंदणीत ३१ टक्यांनी वाढ झाली आहे.त्यात अनुसूचित जातीच्या (SC) मुलींची संख्या ५० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान(Union Education Minister Dharmendra Pradhan)यांनी राज्यसभेत सांगितली. 

प्रधान , राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर गेल्या काही वर्षांत शाळांमध्ये तसेच उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची नोंदणीमध्ये  २५-२६ टक्क्यांनी वाढली आहे. सन २०१४-१५  च्या तुलनेत २०२१-२०२२ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या २६.५ टक्क्यांनी वाढली आहे.त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेण्यात रस दाखवत असल्याचे दिसून येत आहे.  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांच्या नोंदणी वाढीचा दर अनुक्रमे ४४ टक्के आणि ६५ टक्के आहे.  तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा : पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या 350 जागाच का भरणार ?

सध्या  भारतात ३० कोटी विद्यार्थी आहेत. ज्यात इयत्ता पहिली  ते १२ वी  पर्यंतचे २६ कोटी आणि उच्च शिक्षणातील ४ कोटी विद्यार्थी आहेत, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.