SPPU NEWS: विद्यापीठाला जर्मनीचे मंत्री, खासदार, कुलगुरु यांच्यासह २५ उच्चस्तरीय शिष्ट मंडळाने दिली भेट
बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याच्या विज्ञान, संशोधन आणि कला मंत्री पेट्रा ओल्शोव्स्की एमडीएल यांच्या नेतृत्वाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही भेट उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, नैसर्गिक विज्ञान आणि सामाजिक विकास (Science, Information Technology, Engineering, Natural Sciences and Social Development) या क्षेत्रातील सामंजस्य करार, दुहेरी पदवी आणि संयुक्त पदवी कार्यक्रम, शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि नवोपक्रमावर आधारित उपक्रम राबवणे (Implementing MoUs, double degree and joint degree programs, academic exchange programs, joint research projects and innovation-based initiatives) या उद्देशाने जर्मनीच्या उच्च शिक्षण मंत्रालयाच्या २५ सदस्यीय शिष्टमंडळाने मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai Phule Pune Vidyapeeth) भेट दिली.
बाडेन-वुर्टेमबर्ग राज्याच्या विज्ञान, संशोधन आणि कला मंत्री पेट्रा ओल्शोव्स्की एमडीएल यांच्या नेतृत्वाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही भेट उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. शिष्टमंडळाबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक आणि मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांनी संवाद साधला. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. अविनाश कुंभार, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेजेसचे संचालक प्रा. डॉ. देविदास गोल्हर, पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रेमंड दुरैस्वामी, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, महिला आणि लिंग अभ्यास विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. अनघा तांबे, आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, परदेशी भाषा विभागाच्या डॉ. स्वाती आचार्य, आरोग्य विज्ञान विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रा. डॉ. राजू गच्चे आणि कौशल्य विकास विभागाचे प्रा. डॉ. आर.एस.पंडित तसेच त्यांच्यासोबत इतर जर्मनीचे मंत्री, खासदार, मान्यवर शिष्टमंडळ उपस्थित होते .