शिक्षक शाळेच्या मैदानावर, विद्यार्थी वार्यावर अन् पालक बेखबर ; नामांकित शाळेचा अजब कारनामा
जवळपास 40 हून अधिक शिक्षकांचे पगार रखडल्यामुळे शिक्षक हे आंदोलन करत आहेत अशी माहिती आहे. मात्र, एकीकडे शिक्षक आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कडक शिस्त, नियमित अभ्यास अशा अनेक कारणांसाठी नावाजलेल्या CBSE बोर्डाच्या एका शाळेचा अजब कारनामा समोर आला आहे. "मागील काही दिवसांपासून शिक्षक वर्गाकडे फिरकले सुद्धा नाहीत, वर्गात अभ्यास होत नाही, शाळेतील मावशी तेवढी वर्गात येऊन जाते. त्यामुळे आम्ही शाळेत जाणार नाही." अशी तक्रार शहरातील नावाजलेल्या CBSE शाळेचे विद्यार्थी आपल्या पालकांकडे करत आहेत.
ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरातील सिंहगड सिटी स्कूल (Sinhagad City School in Kondhwa area of Pune) टिळेकर नगर येथील सीबीएससी शाळेतील (CBSE School) आहे. या शाळेतील सुमारे 40 हून अधिक शिक्षक (school teachers) वर्गात न जाता खेळाच्या मैदानावर आंदोलन (agitation) करत आहेत. आमचे शिक्षक वर्गात येत नाही म्हणून आम्ही शाळेत जाणार नाही, (Will not go to school.) अशी विनवणी विद्यार्थी आपल्या पालकांना (students parents) करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान (Educational loss) होण्याची शक्यता आहे, अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत.
शाळेत घडलेल्या या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती मिळाली असता, पालकांनी स्वतः शाळेत जाऊन खात्री केली तर सर्व शिक्षक उपोषणासाठी एका झाडाखाली बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी पालकांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबतीत विचारणा केली असता, उडवा-उडवीची उत्तरे मिळाली असे पालकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता सर्व पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुलांना सीबीएससी सारखे उच्च शिक्षण मिळावं म्हणून आम्ही मोलमजुरी करून हजारो रुपये फी भरतो आणि शाळेतील शिक्षक वर्गात जात नाहीत. त्यामुळे मुले शाळेत यायला तयार नाहीत. आता ऐन परीक्षेच्या तोंडावर मुलांमध्ये अशी भावना निर्माण होणे चुकीचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
'एज्यूवार्ता'शी बोलताना एका पालकांनी सांगितले की, माझी मुलगी या शाळेत शिकते. परंतु, वर्गात शिक्षक शिकवण्यासाठी येत नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेतील मावशी सांभाळतात. त्यामुळे माझी मुलगी म्हणते की मी शाळेत जाणार नाही. विशेष म्हणजे पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शाळेतील शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांची फी भरली नाही म्हणून त्यांना पेपरही शाळेने दाखवले नाहीत. विद्यार्थ्यांबाबत ही वागणूक सबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थेने का द्यावी? शिक्षकांचा प्रश्न तात्काळ मिटवावा व आमच्या विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसापासून झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे,अशीही विनंती आता पालकांकडून केली जात आहे.
दरम्यान, जवळपास 40 हून अधिक शिक्षकांचे पगार रखडल्यामुळे शिक्षक हे आंदोलन करत आहेत, अशी माहिती आहे. मात्र, एकीकडे शिक्षक आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दरम्यान, याबाबत शाळा प्रशासनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
शाळेकडून पालकाकांना खालील एसएमएस पाठवण्यात आला आहे.