बारावीच्या पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 17 जुनपर्यंत मुदतवाढ

या पुरवणी परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 17 जुनपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जुलै-ऑगस्टमध्ये (July-August 12th Exam) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी (12th Supplementary Examination) १७ जूनपर्यंत विलंब शुल्काने अर्ज भरण्यास मुदतवाढ (Extension of time for filing application with late fee) देण्यात आली आहे. यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपली असून विद्यार्थ्यांना १७ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर परीक्षेचा अर्ज भरायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे हे शुल्क २० जूनपर्यंत भरायचे आहे. तर शाळा आणि महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या २४ जूनपर्यंत जमा करायच्या आहेत, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे 

बारावीची पुरवणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर १७ जूनपर्यंत विलंब शुल्क भरून अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. या पुरवणी परीक्षेसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्यमंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.