SSC Board Exam : दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात

मार्च २०२४  मधील परीक्षेसाठी मार्च २०२३  अथवा जुलै ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत अर्ज परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

SSC Board Exam : दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात
SSC Board Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC Board) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी (SSC Examination) ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमधून २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल,असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

 

विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज सरल डेटाबेस वरून ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून परीक्षा अर्ज भरता येणार आहेत.

Pune News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू

 

माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS / NEFT होते चलना सह विद्यार्थ्यांच्या याद्या व फ्री लिस्ट जमा करावयाची तारीखनंतर कळवली जाणार आहे, याची सर्व माध्यमिक शाळा प्रमुख/ मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी,  असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

कौशल्य सेतू अभियानाचे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरून विषय समोर ट्रान्सफर ऑफ क्रेडिटची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रचलित पद्धतीने परीक्षा अर्ज व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी.

 

मार्च २०२४  मधील परीक्षेसाठी मार्च २०२३  अथवा जुलै ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत अर्ज परीक्षा अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k