SPPU News : विद्यापीठ करणार शेती; कमवा व शिका योजेतून सेंद्रीय शेतीला देणार चालना

विद्यापीठ आवारातील विविध विभागात काम करणारे विद्यार्थी आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी कमवा व शिका योजनेत काम करतात. या योजनेच्या मानधनात ५५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून ५ रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत

SPPU News : विद्यापीठ करणार शेती; कमवा व शिका योजेतून सेंद्रीय शेतीला देणार चालना
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (SPPU) राबविल्या जात असलेल्या कमवा व शिका (Earn and Learn) या योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात असून विद्यार्थ्यांच्या कामाच्या स्वरूपात सुध्दा बदल करण्यात येणार आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना सेंद्रीय शेतीचे (Organic Farming) धडे दिले जाणार आहेत. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना उत्पादन, पॅकिंग, मार्केटिंग आदी विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य (Senate Member Rahul Pakhare) राहूल पाखरे यांनी सांगितले.

 

विद्यापीठ आवारातील विविध विभागात काम करणारे विद्यार्थी आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी कमवा व शिका योजनेत काम करतात. या योजनेच्या मानधनात ५५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून ५ रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेच्या बैठकीत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य विषयक आणि रोजगाराभिमुख कामे उपलबद्ध करून देण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.

राज्यातील तब्बल ५५० वसतिगृहातील विद्यार्थ्यांना केवळ चार ठेकेदार पुरवणार जेवण; प्रक्रिया वादात

 

विद्यापीठात ऑर्गेनिक फार्मिंगचे बिझनेस मॉडेल तयार केले जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याविषयी बोलताना राहूल पाखरे म्हणाले, विद्यापीठाने सेंद्रीय शेती प्रकल्पासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाबार्डच्या माध्यमातून पॉली हाऊस उभारण्यासाठी अनुदान मिळते. सेंद्रीय शेती प्रकल्प टप्प्या-टप्याने राबविला जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांना ऑर्गेनिक सीड स्टडी, लागवड, कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन,उत्पन्न विक्रीचे मॉडेल या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. तसेच विद्यापीठातच शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नाची विक्री कशी करता येईल, याबाबत आराखडा तयार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले जाणार असल्याने त्यातून विद्यार्थ्यांना पुढे स्वत:चा व्यावसाय उभा करता येऊ शकतो. केवळ २० गुंठे जमिनीवर सेंद्रीय शेती करून अनेक जण यशस्वी उद्योजक झाले आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा लाभ होईल, असेही पाखरे म्हणाले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO