महिला व बालविकास विभागांतर्गत, बीड जिल्ह्यात ६२० पदांची भरती प्रक्रिया सुरू
महिला व बालविकास विभागांतर्गत बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या ६२० रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महिला व बालविकास विभागांतर्गत (Mahila And Bal Vikas Recruitment 2025) बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस (Anganwadi workers and helpers) पदांच्या ६२० रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली असून, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Application process begins) करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक आणि पात्र महिलांनी जिल्हा बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयाकडे १० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी कालिदास बडे (Women and Child Development Officer Kalidas Bade) यांच्याकडून करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील एकूण १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांअंतर्गत ही भरती पूर्ण केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी एकूण ६२० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिरूर कासार आणि पाटोदा प्रकल्पांमध्ये ही प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. मात्र, इतर सर्व प्रकल्पांसाठी २४ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महिला व बालविकास विभागांतर्गत पार पडणारी ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असल्याचे माहिती बीड जिल्हा महिला व बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास बडे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भरती स्थगित करण्यात आली होती, परंतु आता शासनाच्या निर्देशानुसार ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मदतनीसांना पदोन्नतीद्वारे अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती देऊन उर्वरित रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे ते म्हणाले.
eduvarta@gmail.com