डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक प्रमोद रावत 

संस्थेच्या परिषद व नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद त्रिंबक रावत हे नामवंत व्यावसायिक आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक प्रमोद रावत 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society) या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परिषदेची नवीन कार्यकारिणी 1 जानेवारी रोजी म्हणजेच नवीन वर्षात स्थापित झाली.परिषद व नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद त्रिंबक रावत (Pramod Rawat Chairman of Governing Board of Deccan Education Society) यांनी निवड झाली असून  उपाध्यक्षपदी अॅड.अशोक रामराव पलांडे (Ashok Palande)यांची तर संस्थेच्या कार्यवाहपदी धनंजय अनंत कुलकर्णी यांची निवड  झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांची मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत असणार आहे.

संस्थेच्या परिषद व नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद त्रिंबक रावत हे नामवंत व्यावसायिक आहेत.गेली अनेक वर्षे  पुण्यातील रावत फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे हे कायदेतज्ञ असून धनंजय कुलकर्णी हे संस्थेचे आजीव सदस्य असून त्यांची दुसऱ्यांदा संस्थेच्या कार्यवाह पदी निवड झाली आहे.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यक्षेत्र पुणे, मुंबई, सातारा, सांगली या ठिकाणी विस्तारले  आहे. 

हेही वाचा : विद्यापीठाची 111 जागांची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध ; आजपासूनच भरा अर्ज, पहा कोणत्या संवर्गासाठी किती जागा

 संस्थेच्या प्रमुख पदांसह 21 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यात अॅड. राजश्री ठकार, डॉ. रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, गणेश हिंगमिरे, डॉ. शरद आगरखेडकर, मकरंद पाटील, अनिल भोसले, डॉ. प्रीती अभ्यंकर, मिलिंद कांबळे, राजेंद्र जोग, सी. ए. विवेक मठकरी, अमित कुलकर्णी (सर्व पुणे), तर  उषा मराठे, डॉ. सुषमा घुमरे (दोन्ही मुंबई), अनंत जोशी, अमित कुलकर्णी, सी. ए. सारंग कोल्हापुरे (सर्व सातारा) आणि डॉ. विश्राम लोमटे, रवींद्र ब्रम्हनाळकर (दोन्ही सांगली)  यांचा समावेश आहे.