पुण्यातील हे उमेदवार सोलापूर विद्यापीठ कुलगुरू पदाच्या शर्यतीत 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे काही प्राध्यापक व अधिकारी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक असल्याचे आहेत.त्यामुळे या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुण्यातील हे उमेदवार सोलापूर विद्यापीठ कुलगुरू पदाच्या शर्यतीत 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) कुलगुरू पदासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) कार्यरत असणारे काही प्राध्यापक व अधिकारी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू (Vice Chancellor of Solapur University ) पदासाठी इच्छुक असल्याचे आहेत.त्यामुळे या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.परंतु,अंतिम पाच उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतरच कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गळयात पडणार यावर अंदाज बांधणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : #होय_पेटवतोय_मी_महाराष्ट्र! विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार मैदानात, उद्या उपोषण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड व्हावी यासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.त्यात कोणाचे पारडे जड ठरणार यावर सुमारे एक- दीड माहीना शिक्षण क्षेत्रात उलट सुलट चर्चा रंगली होती.मात्र, डॉ.सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.परंतु,पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक असणा-या उमेदवारांपैकीच बहुतांश उमेदवार सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य व आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ.संजय धांडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, प्राध्यापक डॉ.संजय ढोले, बायोटेक्नोलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे,डॉ.विलास खरात हे सर्व उमेदवार सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक आहेत . डॉ.संजय ढोले हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत होते.तर जाडकर,गच्छे व खरात यांनी सुध्दा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पहिल्या टप्प्यात मुलाखत दिली होती.यांच्यासह आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनीही सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मुलाखत दिली आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मुलाखत देणा-या इतर उमेदवारांमध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी , जळगाव विद्यापीठाचे डॉ.ए.एम.महाजन आदी उमेदवारांचा समावेश आहे.पुढील काही दिवसात पाच उमेदवारांची नावे समोर येतील.त्यानंतरच सोलापूर विद्यापीठच्या कुलगुरू पदी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होऊ शकते,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.