RTE admission: 43 हजार विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत

प्रवेशासाठी निवड झालेल्या 93 हजार 9 विद्यार्थ्यांपैकी 50 हजार 67 विद्यार्थ्यांनी आरटीईचे प्रवेश कन्फर्म केले आहेत.त्यामुळे 43 हजार विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतलेला नाही.

RTE admission: 43 हजार विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत
RTE Admission News Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)आरटीई प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया (Online Process of RTE Admission)राबवली जात असून प्रवेशासाठी निवड झालेल्या 93 हजार 9 विद्यार्थ्यांपैकी 50 हजार 67 विद्यार्थ्यांनी आरटीईचे प्रवेश कन्फर्म (Admission Confirmation of RTE)केले आहेत.परिणामी 43 हजार विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडे प्रवेश कन्फर्म करण्यासाठी आता केवळ एका दिवसाचा अवधी शिल्लक आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील 9 हजार 217 शाळांमधील 1 लाख 5 हजार 242 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या जागांसाठी राज्यातील 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. त्यात 93 हजार 9 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून 4 ऑगस्ट पर्यंत 50 हजार 67  विद्यार्थ्यांचे आरटीईचे प्रवेश कन्फर्म झाले आहेत.

 शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी 23 ते 31 जुलैपर्यंत मुदत दिली होती. परंतु, अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टपर्यंत आरटीईचे प्रवेश कन्फर्म करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे यापुढील काळात मुदतवाढ दिली जाणार नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा स्पष्ट सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे 5 ऑगस्ट रोजी आरटीईचा प्रवेश कन्फर्म करण्याची अंतिम मुदत आहे. परिणामी एका दिवसात 43 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना आरटीईचा प्रवेश कन्फर्म करावा लागणार आहे.

आरटीई प्रवेशाची जिल्हानिहाय आकडेवारी 

District RTE Schools RTE Vacancy Total Applications Selections Confirmed Admissions
Ahmadnagar 357 3023 7387 2901 1823
Akola 197 2014 4889 1918 1270
Amravati 232 2396 6626 2300 1394
Aurangabad 574 4451 15103 4242 1696
Bhandara 90 763 1955 760 512
Bid 249 2149 5800 2026 1011
Buldana 234 2581 5386 2411 1664
Chandrapur 199 1516 3049 1402 852
Dhule 105 1137 2849 1102 669
Gadchiroli 66 484 883 424 308
Gondiya 132 903 3029 883 600
Hingoli 114 805 1846 754 411
Jalgaon 283 3033 7810 2826 1852
Jalna 299 1920 5128 1756 894
Kolhapur 325 3032 3894 2394 1478
Latur 215 1865 5762 1796 1027
Mumbai 268 4810 9894 3374 1632
Mumbai 70 1437 --"-- 1361 746
Nagpur 655 6920 20343 6648 2184
Nanded 267 2601 8953 2483 992
Nandurbar 54 419 880 298 177
Nashik 428 5271 14786 4807 2353
Osmanabad 122 1013 2410 970 559
Palghar 265 4773 3660 2677 1839
Parbhani 206 1564 3145 1253 556
Pune 970 17597 48155 16337 7765
Raigarh 264 4008 7363 3516 2118
Ratnagiri 97 812 777 570 440
Sangli 233 1901 2365 1349 753
Satara 222 1804 3542 1668 1094
Sindhudurg 45 293 163 120 92
Solapur 291 2464 5281 2194 1350
Thane 643 11339 19568 9597 5626
Wardha 126 1215 3020 1179 757
Washim 109 953 2047 871 535
Yavatmal 211 1976 4768 1842 1038
Total 9217 105242 242516 93009 50067