IBPS PO भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध; 1 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू
अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल. यानंतर, उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतील. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट ही निश्चित करण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी ( IBPS PO/ MT recruitment 2024) भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. IBPS ने या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) केली असून अर्जाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू (Application process starts from 1st August 2024) होईल. यानंतर, उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतील. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट (Last date for filling the form is 21st August) ही निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय SC, ST आणि PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राथमिक परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. प्रिलिम परीक्षा 19 आणि 20 ऑक्टोबर 2024 रोजी घेतली जाईल. पूर्व परीक्षेत निर्धारित कटऑफ गुण प्राप्त करणारे उमेदवार मुख्य परीक्षेत सहभागी होऊ शकतील. मुख्य परीक्षा ३० नोव्हेंबरला होणार आहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शेवटी मुलाखतीत सहभागी व्हावे लागेल. सर्व टप्प्यांतील यशस्वी उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.