आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे वर्चस्व; महाराष्ट्राच्या आकर्ष राज सहायने ही पटकावले पदक 

महाराष्ट्रातील नागपूर येथील आकर्ष राज सहाय या विद्यार्थ्यानेही रौप्य पदक पटकावले आहे.

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे वर्चस्व; महाराष्ट्राच्या आकर्ष राज सहायने ही पटकावले पदक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय विद्यार्थ्यांनी 54 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2024 (International Physics Olympiad 2024)मध्ये धुवा उडवून दिली आहे. 21 जुलै ते 29 जुलै दरम्यान इराणमधील इस्फहान (Isfahan in Iran)येथे ही स्पर्धा पार पडली. भारतीय संघातील पाचही विद्यार्थ्यांनी (Students from India team)पदके जिंकली आहेत. यामध्ये दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदक आहेत. महाराष्ट्रातील नागपूर येथील आकर्ष राज सहाय (Akarsh Raj Sahay from Nagpur)या विद्यार्थ्यानेही रौप्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेत चीनने पहिले स्थान पटकावले, तर दुसऱ्या क्रमांकावर रशिया आणि तिसऱ्या स्थानावर रोमानिया आहे. तर  भारत आणि व्हिएतनाम चौथ्या स्थानावर आहेत.  

रायपूर, छत्तीसगडच्या रिदम केडिया आणि इंदूर, मध्य प्रदेशच्या वेद लाहोटी यांनी इराणमध्ये झालेल्या 54 व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर महाराष्ट्रातील नागपूर येथील आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील भव्य तिवारी आणि राजस्थानच्या कोटा येथील जयवीर सिंग यांनी रौप्यपदक पटकावले.

भारतीय संघाचे नेतृत्व प्रा. दीपक गर्ग (डीएव्ही कॉलेज, चंदीगड) आणि डॉ. शिरीष पठारे (एचबीसीएसई, टीआयएफआर). प्रो. ए. सी. बियाणी (निवृत्त, शासकीय नागार्जुन पदव्युत्तर विज्ञान महाविद्यालय, रायपूर) आणि प्रा. विवेक भिडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) यांनी वैज्ञानिक पर्यवेक्षक म्हणून केले. 
या स्पर्धेत 43 देशांतील एकूण 193 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड (IPhO) ही हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक चॅम्पियनशिप भौतिकशास्त्र स्पर्धा असून ती दरवर्षी वेगळ्या देशात आयोजित केली जाते.