आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अमोल गोळे,प्राची पवार प्रथम

या स्पर्धेत वरिष्ठ विभागातून निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या अमोल गोळे व कनिष्ठ विभागातून अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या प्राची पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अमोल गोळे,प्राची पवार प्रथम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वरिष्ठ विभागातून निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या अमोल गोळे व कनिष्ठ विभागातून अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या प्राची पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहयोगातुन यंदाही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कैलास शिंदे, प्रा. गीतांजली हाके यांनी स्पर्धेचे यशस्वीरित्या नियोजन केले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणुन डॉ. गजानन भोसले, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी, प्रा.शिवाजी मोटेगावकर यांना कामकाज पाहिले व निकाल जाहीर केला. पीपल्स एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.

वरिष्ठ विभागात प्रथम क्रमांक - अमोल गोळे (निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, भोर), द्वितीय क्रमांक - पूर्वा नाकतोडे (अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर) , तृतीय क्रमांक - रसिका भोसले (डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, येरवडा), उत्तेजनार्थ - नितीन गागरेज (संस्कार मंदिर संस्था महाविद्यालय वारजे) तर कनिष्ठ विभागातुन प्रथम क्रमांक - प्राची पवार (श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर), द्वितीय क्रमांक - समर्थ देसाई (साधना महाविद्यालय, हडपसर), तृतीय क्रमांक - कार्तिकी सुरवसे (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर), उत्तेजनार्थ - पुष्पराज झोल (आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे) यानुसार विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कैलास शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. श्रेयसी परब, प्रा.गीतांजली हाके, प्रा.रीमा खरे यांनी केले. आभार प्रा. डॉ. रुपेश थोपटे यांनी मानले.