नाबार्ड भरती २०२६ : विकास सहाय्यक पदासाठी अर्ज सुरू, फेब्रुवारीपर्यंत मुदत
नाबार्ड भरती २०२६ मधून विकास सहाय्यक गट ब आणि विकास सहाय्यक (हिंदी) गट 'ब' या दोन पदांच्या एकूण १६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये दोन टप्पे असणार आहेत. सुरुवातीचा टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा जी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तर दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा असणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकने (नाबार्ड) विकास सहाय्यक आणि विकास सहाय्यक (हिंदी) या पदांच्या भरतीसाठी (NABARD Recruitment 2026) अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार नाबार्डचे अधिकृत संकेतस्थळ www.nabard.org येथे या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू (online application process has started) झाली असून उमेदवार ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज (The deadline for applications is February 3rd) करू शकतात.
हेही वाचा - शाळेत भ्रष्ट्राचार: सगळं केवळ कागदावर,सरपंचाच्या पतीने पैसे काढले; चिमुकलीच अजित पवारांना भावनिक पत्र
नाबार्ड भरती २०२६ मधून विकास सहाय्यक गट ब आणि विकास सहाय्यक (हिंदी) गट 'ब' या दोन पदांच्या एकूण १६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये दोन टप्पे असणार आहेत. सुरुवातीचा टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा जी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तर दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा असणार आहे.
वयोमर्यादा
अर्ज करण्याची वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. वयात सूट देखील उपलब्ध आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना पाच वर्षांची वयोमर्यादा, ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची वयोमर्यादा आणि अपंग उमेदवारांना दहा वर्षांची वयोमर्यादा सूट मिळेल.
शैक्षणिक पात्रता
विकास सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. शिवाय, विकास सहाय्यक (हिंदी) पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क
नाबार्डमध्ये विकास सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट www.nabard.org ला भेट देऊन नोंदणी करावी. याव्यतिरिक्त, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे, तर खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ४५० रुपये आहे. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.