CA फाउंडेशन जून 2024 च्या परीक्षेचा निकाल जाहीर 

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पोर्टलच्या होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

CA फाउंडेशन जून 2024 च्या परीक्षेचा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ (ICAI) द्वारे आयोजित चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाउंडेशन कोर्स परीक्षा जूनचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार icai.nic.in या अधिकृत पोर्टलवर त्यांचा निकाल पाहू शकतात.

उमेदवारांनी त्यांचा निकाल जाणून घेण्यासाठी आणि गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत पोर्टल icai.nic.in ला भेट द्यावी. त्यानंतर विद्यार्थ्यांना या पोर्टलच्या होम पेजवर CA Foundation Result (CA Foundation Result 2024) लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, नवीन पृष्ठावर, विद्यार्थी आपला रोल नंबर सबमिट करू शकतील आणि स्क्रीनवर निकाल पाहू शकतील. 

CA फाउंडेशन जून 2024 सत्र परीक्षा ICAI द्वारे 20, 22, 24 आणि 26 जून रोजी घेण्यात आल्या होत्या. परीक्षा प्रत्येक तारखेला प्रत्येकी तीन तासांच्या एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के आणि एकूण 50 टक्क्यांहून अधिक गुण आवश्यक आहेत.