एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! प्रशिक्षण संस्थेत १४०० जागांची वाढ 

राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या घटकांतील यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एमपीएससी-यूपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! प्रशिक्षण संस्थेत १४०० जागांची वाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षेची (Competitive Examination) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुजन घटकांतील विद्यार्थ्यांना (Students from backward communities) प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी, या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूरमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) प्रशिक्षणामध्ये १४०० जागांची भरघोस वाढ (Increase in training by 1,400 seats) करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा - मुंबईत ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित काढली, ११११ फुटाची तिरंगा यात्रा

राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या घटकांतील यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या परंतू स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होणार आहे. 

यामध्ये यूपीएससीसाठी विद्यार्थ्यांसाठी ४०० तर एमपीएससीसाठी तब्बल १,००० प्रशिक्षण जागा वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाज्योतीने घेतला आहे. यापूर्वी यूपीएससीसाठी केवळ १०० तर एमपीएससीसाठी ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होती. मात्र, आता घेतलेल्या निर्णयामुळे 'महाज्योती'कडील प्रशिक्षणासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.