शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी; बच्चू कडू यांच्या मागणीनंतर समिती स्थापन
शासनाच्या कार्यालयातील तयार झालेले वैयक्तिक मान्यता आदेश आणि कळंबोलीतील शाळेतून दिलेले आदेश ह्यांच्या Font मध्ये खूप मोठी तफावत आढळून येत आहे.अनेक वैयक्तिक मान्यता ह्या कार्यालयाबाहेर वाटप केल्याने त्यांच्या प्रस्तावाच्या फाईल्स ह्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाहीत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत असताना आता रायगड जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. नवी मुंबई येथील शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून नाळे यांच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पुढील पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
अंशत: अनुदानित वरून अनुदानित शाळेत बदली करण्याचा अधिकार शासनाने 13 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार शिक्षण आयुक्त यांना दिला आहे, असे असताना शिक्षणाधिकारी नाळे यांनी शासनाच्या या आदेशाला धाब्यावर बसून स्वतःच्या अधिकारात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून बदल्या केल्या आहेत.त्याचप्रमाणे
शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी आपला संपूर्ण कारभार शिक्षणाधिकारी कार्यालयात न करता तो सुधागड एजुकेशन सोसाटीच्या कळंबोली शाखेतून करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्या संबंधीची सर्व माहिती बच्चू कडू यांनी शिक्षण विभागास सादर केली आहे.
शासनाच्या कार्यालयातील तयार झालेले वैयक्तिक मान्यता आदेश आणि कळंबोलीतील शाळेतून दिलेले आदेश ह्यांच्या Font मध्ये खूप मोठी तफावत आढळून येत आहे.अनेक वैयक्तिक मान्यता ह्या कार्यालयाबाहेर वाटप केल्याने त्यांच्या प्रस्तावाच्या फाईल्स ह्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाहीत. याबाबत विचारपूस केल्यावर मागील आठवड्यात त्यांनी काही फाईल्स जमा केल्या आहेत. कार्यालयातील एकाही कर्मचाऱ्याची त्यावर टिप्पणी नाही. ह्या कामाची आपण सखोल चौकशी SIT मार्फत करावी. तसेच २ मे २०१२ नंतर शासनाने संपूर्ण शिक्षकभरतीवर बंदी घातलेली असताना शिक्षणाधिकारी नाळे यांनी अनेक वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत.
शिक्षणाधिकारी कार्यालय अलिबाग, रायगड यांच्या आवक जावक रजिस्टरच्या नोंदी आणि नाळे यांनी वाटप केलेल्या अनधिकृत वैयक्तिक मान्यतांवरील outward number ह्यांमधे खूप मोठी तफावत आहे. संचमान्यतेत पद उपलब्ध नसताना नाळे यांनी अनेक वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहेत. न्यायालयाने निर्णय द्या असा आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून शासनाची पूर्वपरवानगी न घेता पद उपलब्ध नसताना त्यांनी अनेक वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत. नाळे यांनी अनेक चुकीच्या वैयक्तिक मान्यता लाखो रुपये घेऊन दिल्या आहेत.परंतु त्या फाईल्स शालार्थ आय. डी. साठी आपल्या कार्यालयाकडे पाठवून दिलेल्या नाहीत, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
शासनाची पूर्वपरवानगी न घेता अनेक जणांच्या D.Ed वरून B.Ed वर बदल्या केलेल्या आहेत ह्या बदल्यांत लाखो रुपये घेतलेले आहेत.अनेक मोठ्या संस्थांच्या दावणीला बांधलेल्या नाळे यांनी त्या संस्थांत सेवाज्येष्ठता डावलून D.Ed वरून B.Ed वर मान्यता दिलेल्या आहेत.अनेक मुख्याध्यापकांना D.Ed वरती मुख्याध्यापक म्हणून मान्यता दिलेली आहे. ATD to AM अशा अनेक चुकीच्या मान्यता शासनाचे नियम धाब्यावर बसवून दिल्या आहेत. शाळेत एकही D.Ed चा शिक्षक शिल्लक न ठेवता सर्व शिक्षकांना D.Ed to B.Ed मान्यता दिल्या आहेत.अनेक कर्मचाऱ्यांना जुन्या LPC धोरणानुसार वेतन देण्याचे आदेश नाळे यांनी दिले, याबाबतचे पुरावे आवश्यक पुरावे शिक्षण विभागास सादर करण्यात आले आहे.