UPSC NDA आणि NA-I परीक्षेच्या तारखा जाहीर, या दिवशी परीक्षा
UPSC १२ एप्रिल २०२६ रोजी UPSC NDA/NA-I परीक्षा घेईल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. गणिताची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत घेतली जाईल. तर सामान्य क्षमता परीक्षा दुसर्या शिफ्टमध्ये दुपारी २:०० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत घेतली जाईल. NDA/NA-I परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आता परीक्षेच्या तारखांनुसार पद्धतशीरपणे तयारी करू शकतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर (Exam dates announced) केल्या आहेत. UPSC ने १० डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान NDA/NA-I पदांच्या (NDA/NA-I Exam 2026) भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले. त्यानंतर आता आयोगाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. UPSC १२ एप्रिल २०२६ रोजी UPSC NDA/NA-I परीक्षा (UPSC NDA/NA-I exam on April 12, 2026) घेईल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.
हेही वाचा - सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्याने पंख्याला गळफास घेऊन केली आत्महत्या
UPSC १२ एप्रिल २०२६ रोजी UPSC NDA/NA-I परीक्षा घेईल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. गणिताची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत घेतली जाईल. तर सामान्य क्षमता परीक्षा दुसर्या शिफ्टमध्ये दुपारी २:०० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत घेतली जाईल. NDA/NA-I परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आता परीक्षेच्या तारखांनुसार पद्धतशीरपणे तयारी करू शकतात.
यूपीएससी एनडीए/एनए आय २०२६ ची परीक्षा दोन टप्प्यात घेईल. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखत असेल. लेखी परीक्षेत दोन पेपर असतील. पहिला पेपर गणितावर असेल, ज्याचे एकूण ३०० गुण असतील. ही परीक्षा अडीच तासांची असेल. तर दुसर्या सत्रात जनरल अॅबिलिटीचा पेपर असेल, जो एकूण ६०० गुणांचा असेल, जो अडीच तासांचा असेल. या परीक्षेत निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील.
एनडीए परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांना तीन महिने आहेत. या परीक्षेला बसण्यास इच्छुक असलेले उमेदवार त्यांची तयारी करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकतात. तुमची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट देखील एक उत्तम पर्याय असल्याचे सांगण्यात आले आहे.