'पदवीधर, शिक्षक' मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी

मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी फॉर्म-७ व यादीच्या तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म-८ भरावा. आतापर्यंत 'पदवीधर'साठी २० हरकती आल्या आहेत. 'शिक्षक'साठी हरकती दाखल नाहीत. सर्व हरकती निकाली निघाल्या आहेत. यादीवर आक्षेप, दावे सादर करणे, नवीन नोंदणीसाठीचे अर्ज पदनिर्देशित अधिकारी, सर्व प्रांत-तहसील कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

'पदवीधर, शिक्षक' मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची यादी प्रसिद्ध (Voter list published) केलेली आहे. मात्र, ज्यांनी अद्याप मतदार नोंदणी (Voter registration) केली नाही, त्यांना आता शेवटची संधी देण्यात आली आहे. संबंधितांनी पदनिर्देशित अधिकारी, सर्व प्रांत, तहसील कार्यालये तसेच मुख्य निवडणूक आयोगाच्या (Chief Election Commission) संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील (District Collector Santosh Patil) यांच्याकडून पदवीधर व शिक्षक मतदारांना करण्यात आले आहे. 

हेही वाचा - पतंगाच्या मांज्यामुळे ७ वर्षाच्या चिमुकल्याचा चिरला गळा, प्रकृती गंभीर

मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी फॉर्म-७ व यादीच्या तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म-८ भरावा. आतापर्यंत 'पदवीधर'साठी २० हरकती आल्या आहेत. 'शिक्षक'साठी हरकती दाखल नाहीत. सर्व हरकती निकाली निघाल्या आहेत. यादीवर आक्षेप, दावे सादर करणे, नवीन नोंदणीसाठीचे अर्ज पदनिर्देशित अधिकारी, सर्व प्रांत-तहसील कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

१ नोव्हेंर २०२५ ही अर्हता दिनांक मानून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात पदवीधरसाठी १२३ केंद्रे असून, ४१ हजार ३९८ मतदार नोंदणी झाली आहे. शिक्षकसाठी ४४ मतदान केंद्रे असून, ९००२ मतदारांची असल्याचे सांगण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी https://www.satara.gov.in संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे

कोणाला करता येणार नोंदणी

दोन्ही मतदारसंघातील नोंदणीसाठी भारतीय नागरिक, सातारा जिल्ह्यातील सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. 'पदवीधर'साठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवीधारक किंवा समकक्ष पदविका असणे आवश्यक आहे.
'शिक्षक'साठी १ नोव्हेंबर २०१९ 3 नंतर कमीत कमी तीन वर्षे मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत पूर्ण वेळ शिक्षक असणे आवश्यक आहे. पात्र मतदारांना मुख्य निवडणूक आयोगाच्या https://mahaelection.gov.in/Citi zen/Login संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.