पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ३ फेब्रुवारी रोजी होणार संबंधित पेपर 

डॉ. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील अंत्यसंस्कारानिमित्त आज गुरुवार (दि. 29) जानेवारी 2026 रोजी बारामती तालुक्यातील बहुतेक शैक्षणिक संस्था बंद राहण्याची शक्यता, तसेच महाराष्ट्रातून बारामतीकडे येणारा उद्याचा जनसमुदाय लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या विधी आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या दोन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ३ फेब्रुवारी रोजी होणार संबंधित पेपर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याचे उपज नेटवर्कमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात शोकाकूल वातावरण आहे, अशा परिस्थिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) परीक्षांच्या वेळापत्रकात बदल (Changes in the examination schedule) केले आहेत. पुणे विद्यापीठातील विविध विषयांच्या सध्या सुरू परीक्षा आहेत. यातील विधी आणि एमबीए अभ्यासक्रमांचे पेपर (Law and MBA course exams cancelled) आज २९ जानेवारी रोजी होणार होते. मात्र, हे पेपर रद्द करण्यात आले आहेत. विधी आणि एमबीए अभ्यासक्रमाचे संबंधित पेपर आता येत्या ३ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई (Dr. Prabhakar Desai) यांनी दिली आहे. 

डॉ. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील अंत्यसंस्कारानिमित्त आज गुरुवार (दि. 29) जानेवारी 2026 रोजी बारामती तालुक्यातील बहुतेक शैक्षणिक संस्था बंद राहण्याची शक्यता, तसेच महाराष्ट्रातून बारामतीकडे येणारा उद्याचा जनसमुदाय लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या विधी आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या दोन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दोन्ही सत्रातील परीक्षांचे फेरआयोजन वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. तरी सर्व प्राचार्य आणि संचालक यांनी संबंधित माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत तात्काळ पोहोचवावी असे आवाहन देखील डॉ. देसाई यांनी केले आहे.