मोठी अपडेट : दहावी-बारावीच्या परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याची गरज नाही!

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) च्या अनुषंगाने शालेय शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क तयार केले आहे.

मोठी अपडेट : दहावी-बारावीच्या परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याची गरज नाही!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता दहावी (SSC) व बारावीसाठी (HSC) एक मोठी बातमी आहे. बोर्डाच्या परीक्षांचे (Board Exams) दडपण कमी करण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) मोठे पाऊल उचलले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे की, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची गरज नाही. जरी १० वी, १२ वी बोर्डाच्या  परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यात येणार असल्या तरी  इच्छूक विद्यार्थी एकदाच बोर्डाची परीक्षा देऊ शकतात.  

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या अनुषंगाने शालेय शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क तयार केले आहे. त्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यामधून विद्यार्थ्यांना त्यांचा  सर्वोत्तम स्कोअर निवडण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे.

लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

  

यासंदर्भात बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान म्हणाले, "विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE प्रमाणेच वर्षातून दोनदा १० वी आणि १२ वी च्या  परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. त्यातून विद्यार्थी त्यांचे  ते सर्वोत्तम गुण निवडू शकतील, पण हा पर्याय  पूर्णपणे ऐच्छिक असेल, याची विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती नसेल. विद्यार्थ्यांना अनेकदा या विचाराने ताण येतो की त्यांनी एक वर्ष गमावले, त्यांची संधी गेली किंवा अधिक चांगली कामगिरी करू शकले असते.

 

एकाच संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे. पण कोणत्याही विद्यार्थ्याला असे वाटत असेल की तो पूर्णपणे तयार आहे आणि परीक्षेच्या पहिल्या सेटमधील गुणांवर तो समाधानी आहे, तर तो पुढील परीक्षांना न बसणे निवडू शकतो, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले. 

 

CABE सुधारित केले जाईल

शिक्षण मंत्री पुढे म्हणाले की, केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली जाईल कारण त्याची जुनी आवृत्ती आजच्या पद्धतीनुसार योग्य नाही किंवा ती आजच्या शिक्षण पद्धतीत बसत नाही. ते म्हणाले की, जेव्हा एनईपीच्या नवीन बदलांसह पावले उचलली जात आहेत, तेव्हा सीएबीई देखील बदलण्याची गरज आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k