जेएनयू, अलीगढ, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांचे पॅलेस्टाईनला समर्थन

अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पायी मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हातात वी स्टँड पॅलेस्टाईन, एएमयू स्टँड विथ पॅलेस्टाईन असे पोस्टर्स आणि बॅनर घेऊन निदर्शने केली.

जेएनयू, अलीगढ, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांचे पॅलेस्टाईनला समर्थन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

 

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine War) यांच्यात सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे आता भारतातही (India) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इस्रायलला पाठिंबा दिला असला तरी दुसरीकडे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (Aligarh Muslim University), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनला समर्थन दिले आहे.

 

अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पायी मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हातात वी स्टँड पॅलेस्टाईन, एएमयू स्टँड विथ पॅलेस्टाईन असे पोस्टर्स आणि बॅनर घेऊन निदर्शने केली.  पत्रकारांशी संवाद साधताना आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले की, " इस्रायल ज्या प्रकारे पॅलेस्टाईनवर अत्याचार करत आहे ते योग्य नाही. ते म्हणाले की, युक्रेनवर हल्ला झाला की देश आणि जग युक्रेनच्या समर्थनात येते, पण आता पॅलेस्टाईनमध्ये संकट उभे असताना कोणीही राजकारणी किंवा इतर समाजाचे गुणगान करणारे लोक गप्प बसले आहेत.

लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

 

आज पॅलेस्टाईन संकटात आहे, मात्र अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि एएमयूचे सर्व विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. पॅलेस्टाईनचे लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. त्यांना स्वातंत्र्य दिले जात नाही. पॅलेस्टाईनमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

 

जेएनयूमधील एआयएसए आणि जेएनयूएसयू या विद्यार्थी संघनटांसह जामिया विद्यापीठातील एनएसयूआय आणि एसएससी या संघटनेनेही पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. त्यामुळे पोलिसांकडून दक्षता म्हणून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

 

दरम्यान,  शनिवारपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन समर्थक अतिरेकी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर हमासने गाझा पट्टीच्या सीमा तोडून इस्रायलमध्ये घुसून नागरिकांना लक्ष्य केले आणि त्यांना ओलीस ठेवले. त्यानंतर इस्रायलनेही जबरदस्त ताकदीने प्रत्युत्तर देत युद्धाची घोषणा केली आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी एक हजाराहून अधिक लोक मारले गेले असून हजारो जखमी झाले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k