नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या प्रवेशासाठी मिळणार आणखी एक संधी
LEST 2025 साठी नोंदणी केल्यानंतर, उमेदवाराला अर्जामध्ये काही सुधारणा करायची असल्यास, त्यासाठी एक दुरुस्ती विंडो उघडली जाईल. ही विंडो नोंदणीच्या शेवटच्या तारखेपासून दोन दिवसांपर्यंत उपलब्ध असेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
NVS च्या अधिकृत सूचनेनुसार, "जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी आणि 11 वी च्या रिक्त जागांसाठी निवड चाचणीद्वारे ऑनलाइन नोंदणी चालू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे."
LEST 2025 साठी नोंदणी केल्यानंतर, उमेदवाराला अर्जामध्ये काही सुधारणा करायची असल्यास, त्यासाठी एक दुरुस्ती विंडो उघडली जाईल. ही विंडो नोंदणीच्या शेवटच्या तारखेपासून दोन दिवसांपर्यंत उपलब्ध असेल. या कालावधीत, उमेदवारांना लिंग, श्रेणी (सामान्य, OBC, SC, ST), क्षेत्र (ग्रामीण किंवा शहरी), अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम यासारख्या तपशीलांमध्ये सुधारणा करण्याची परवानगी असेल. LEST 2025 परीक्षा 8 फेब्रुवारी 2025 रोजी घेतली जाईल.
9 वीच्या वर्गासाठी पात्रता व निकष
उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करत असलेल्या जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने शैक्षणिक सत्र 2024-25 दरम्यान जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 8 वी शिकलेला असणे आवश्यक आहे.1 मे 2010 ते 31 जुलै 2012 दरम्यान जन्मलेले उमेदवार वर्ग 9 साठी अर्ज करण्यास पात्र असतील. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र असतील आणि JNV जेथे आहे त्याच जिल्ह्यात इयत्ता 8 वी शिकणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज घेतले जातील.
इयत्ता 11 वीसाठी पात्रता व निकष
उमेदवाराचा जन्म 1 जून 2008 ते 31 जुलै 2010 दरम्यान झालेला असावा. शैक्षणिक सत्र 2024-25 दरम्यान उमेदवार सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 10 वी शिकत असावा. इयत्ता 10वीत शिकणाऱ्या उमेदवारांनाच 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची परवानगी असेल. सत्र 2024-25 पूर्वी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र असणार नाहीत. भारतात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय नागरिकांकडूनच अर्ज स्वीकारले जातील.
eduvarta@gmail.com