सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पेस ऑन व्हील्सचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पेस ऑन व्हील्सचे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन येथे विज्ञान भारती व इस्त्रो यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्पेस ऑन व्हील्स' ह्या विज्ञान प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९  नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हा प्रकल्प विद्यापीठात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे

या प्रकल्पाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञानाचा प्रचार आणि जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. अंतराळ संशोधनाची ओळख इस्रोच्या मोहिमांचे प्रतिकृती मॉडेल्स, माहिती आणि प्रश्नमंजुषा इ. प्रकल्पाची वैशिष्ट्येः आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यासह शिक्षक, विज्ञान प्रेमी आणि नागरिकांसाठी खुला असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आव्हान करण्यात आले आहे.