IIT Bombay : UCEED परीक्षेच्या नोंदणीची अंतिम मुदत वाढली!

UCEED 2025 परीक्षा  19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.  ही परीक्षा सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा दोन भागात विभागली जाईल. भाग 1 संगणक-आधारित असेल. भाग 2  यामध्ये रेखाटनाशी संबंधित प्रश्न असतील जे उमेदवाराला दिलेल्या शीटवर सोडवावे लागतील.

IIT Bombay : UCEED परीक्षेच्या नोंदणीची अंतिम मुदत वाढली!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (IIT Bombay) पदवीपूर्व डिझाईन प्रवेश परीक्षा (Undergraduate Common Entrance Exam for Design) UCEED 2025 साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. (The registration deadline has been extended) ज्या उमेदवारांना या परीक्षेला बसायचे आहे ते UCEED च्या अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in ला  भेट देऊन अर्ज करू शकता. आता अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.
अधिकृत नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, "विलंब शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:00 पर्यंत वाढवण्यात आली आहे."

UCEED 2025 परीक्षा 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा दोन भागात विभागली जाईल. भाग 1 संगणक-आधारित असेल. भाग 2  यामध्ये रेखाटनाशी संबंधित प्रश्न असतील जे उमेदवाराला दिलेल्या शीटवर सोडवावे लागतील. उमेदवारांना दोन्ही भाग विहित मुदतीत सोडवणे बंधनकारक आहे. परीक्षेचा एकूण कालावधी ३ तासांचा असेल. ही परीक्षा भारतातील २७ शहरांमध्ये घेतली जाणार आहे.

पात्रता निकष
उमेदवार ओपन, EWS किंवा OBC-NCL प्रवर्गातील असल्यास, त्याचा/तिचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 नंतर झालेला असावा. उमेदवार SC, ST किंवा PWD प्रवर्गातील असल्यास, त्याचा/तिचा जन्म 1 ऑक्टोबर 1995 नंतर झालेला असावा.

UCEED 2025: नोंदणी प्रक्रिया 

मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या UCEED 2025 नोंदणी लिंकवर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, उमेदवाराला त्याच्या/तिच्या खात्यात लॉग इन करावे लागेल. त्यानंतर अर्ज भरा आणि अर्जाची फी भरा. अर्ज सबमिट करा