NEET UG Counselling 2023 : पहिल्या फेरीची अंतिम निवड यादी जाहीर, उद्यापासून घ्या प्रत्यक्ष प्रवेश

NEET UG Counselling 2023 : पहिल्या फेरीची अंतिम निवड यादी जाहीर, उद्यापासून घ्या प्रत्यक्ष प्रवेश
NEET UG Counselling 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET UG Counselling : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG) साठी घेण्यात आलेल्या समुपदेशनाच्या पहिल्या फेरीची अंतिम निवड यादी रविवारी (३० जुलै) रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) च्या mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी थेट या संकेतस्थळावरून जागा वाटप देखील तपासू शकतात.

ज्या उमेदवारांना NEET UG च्या पहिल्या टप्प्यात जागा वाटप करण्यात आल्या आहेत ते उमेदवार आज पासून आवश्यक  कागदपत्रे अपलोड करू शकतील.  तसेच  ३१ जुलै ते ४ ऑगस्ट  या कालावधीत वाटप केलेल्या संस्थेत उमेदवारांनी त्यांची सीट कन्फर्म करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या यादीनुसार देशभरातील वैद्यकीय महाविद्यायांमध्ये १५ टक्के राखीव कोट्याअंतर्गत प्रवेश दिला जातो. 

शासन स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठांना अनुदान देणार

दि. ४ ऑगस्टपर्यंत समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर MCC ला ५ ते ६ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा डेटा शेअर करावा लागेल. दि. ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत समुपदेशनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू होईल. NEET UG प्रवेशाची समुपदेशन प्रक्रिया चार टप्प्यात केली जाणार आहे. 

असा बघा निकाल 
* वेबसाइटच्या होम पेजवर समुपदेशन फेज-1  लिंकवर  क्लिक करा.
* क्रेडेंशियल्स टाकून विनंती केलेली माहिती (लॉगिन) सबमिट करा 
* तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD