पदव्युत्तर नीट परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर, नीट पीजी ३० ऑगस्टला तर एमडीएस २ मे रोजी
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून पदव्युत्तर दंत (एमडीएस) व वैद्यकीय (पीजी) अभ्यासक्रमांसाठीच्या नीट परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नीट-पीजी परीक्षा ३० ऑगस्ट रोजी, तर नीट एमडीएस परीक्षा २ मे रोजी होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (National Commission for Medical Sciences) राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून (National Examination Board) पदव्युत्तर दंत (एमडीएस) व वैद्यकीय (पीजी) अभ्यासक्रमांसाठीच्या नीट परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नीट-पीजी परीक्षा ३० ऑगस्ट (The NEET-PG exam will be held on August 30) रोजी, तर नीट एमडीएस परीक्षा २ मे रोजी (MDS exam on 2nd May) होणार आहे.
या दोन्ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यात येणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळावरील माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. नीट एमडीएस परीक्षेसाठी विद्यार्थ्याला ३१ मे पर्यंत आंतरवासिता पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नीट-पीजी परीक्षेसाठी आंतरवासिता पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखा या संभाव्य असून, अधिक माहितीसाठी मंडळाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेचा वापर करावा. ही माहिती पुस्तिका https:// natboard. edu. in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या शंका, साहाय्यासाठी उमेदवारांनी एनबीईएमएसच्या स्पष्टीकरण किंवा https://exam. natboard.edu.in/communication. php? page = main या लिंकला सातत्याने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.