इंडियन बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल आहे. 

इंडियन बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

एज्युवार्ता न्यूज नटवर्क

तुम्ही बँकेत नोकरी करु इच्छीता, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (Bank Specialist Officer) पदासाठी अर्ज मागवले  (Application process starts) आहेत. ज्या उमेदवारांना या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला (Officeal Website) भेट देऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल (Deadline 1st April) आहे. 

इंडियन बँक एसओ पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. उमेदवार indianbank.in. या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे, उमेदवारांना एकूण 146 विशेषज्ञ अधिकारी पदांवर नियुक्त केले जाईल. अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PDWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

वरिष्ठ व्यवस्थापक क्रेडिटच्या पदासाठी, ज्या उमेदवारांनी CA/ICWA केले आहे आणि पाच वर्षांचा अनुभव आहे ते अर्ज करू शकतात. मुख्य व्यवस्थापकासाठी, पदवीधर असणे आणि FRM केलेले असणे आवश्यक आहे. 21 ते 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गालाही वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.