MHT CET 2024 : PCB आणि PCM निकाल 'या' तारीखेला जाहीर होणार

महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेलकडून एमएएच सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहत येईल. 

MHT CET 2024 : PCB आणि PCM निकाल 'या' तारीखेला जाहीर होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या (MHT CET ) PCM आणि PCB परीक्षेचा निकाल 12 जून (PCM and PCB Exam Result 12 June) किंवा त्यापूर्वी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेलकडून (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमएएच सीईटी परीक्षेचा (MAH CET Exam 2022) निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहत येईल. 

MHT CET 2024 निकालाची तारीख CET सेलने अधिकृत परिपत्रकात जाहीर केली जाईल. संबंधित गटासाठी (PCB आणि PCM) पर्सेंटाइल स्कोअर असलेले MHT-CET-2024 स्कोअर कार्ड 12 जून 2024 रोजी किंवा त्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

यावर्षी एमएचटी सीईटी 2024 परीक्षा 30 सत्रांमध्ये घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण 5100 प्रश्न वापरले होते. ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश होता. त्यापैकी केवळ ४७ प्रश्नांवर घेतलेला अक्षेप वैध असल्याचे आढळून आले आहे. 

असा पाहाता येणार निकाल 

परीक्षार्थींनी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.  यानंतर होमपेज समोर येईल. होमपेजवरील स्कोर कार्ड लिंकवर क्लिक करा. आता अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरून लॉग इन करा. आता तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकाल डाऊनलोड करुन प्रिंट आऊट काढून घ्या.