मुंबई पोलीस भरती २०२१ : प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्त पत्र द्या; खा. सुप्रिया सुळे

मुंबई पोलीस भरती २०२१ प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे आणि पोलीस व्हेरीफिकेशन पुर्ण झाले आहे. केवळ मेडीकल तपासणी करुन त्यांना नियुक्ती देणे बाकी आहे.

मुंबई पोलीस भरती २०२१ : प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्त पत्र द्या; खा. सुप्रिया सुळे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई पोलीस भरती २०२१ (Mumbai Police Recruitment 2021) प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची (Candidates in waiting list) कागदपत्रे आणि पोलीस व्हेरीफिकेशन पुर्ण झाले आहे. केवळ मेडीकल तपासणी करुन त्यांना नियुक्ती देणे बाकी आहे. शासनाने या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याची गरज आहे. सदरील प्रकरणाची दखल घेऊन ही प्रक्रिया तातडीने पुर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे 'एक्स' या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे केली आहे. 

मुंबई पोलीस भरती २०२१ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची लवकरात लवकर मेडीकल चाचणी करुन त्यांना ताटकळ न ठेवता नियुक्ती देण्यात यावी. त्यांची कागदपत्रे जमा करुन घेतल्याने त्यांना अन्य भरती प्रक्रियेमध्ये सहभाग देखील घेता येत नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मेडीकल चाचणी करून पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

विशेष म्हणजे या उमेदवारांची ओरीजनल कागदपत्रे समांतर आरक्षणामुळे जमा करुन घेतली आहेत. त्यामुळे हे उमेदवार इतरत्र अर्ज देखील करु शकले नाहीत. ही प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरु आहे. परिणामी या उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याचे खा. सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात गृहविभागाकडून काय निर्णय घेतला जातो.हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.