UGC NET डिसेंबर 2023 परीक्षेचा निकाल पुढे ढकलला ; आता निकाल 17 जानेवारीला

चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने निकाल 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.      

UGC NET डिसेंबर 2023 परीक्षेचा निकाल पुढे ढकलला ; आता निकाल 17 जानेवारीला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएतर्फे घेण्यात आलेल्या नेट परीक्षेचा निकाल 10 जानेवारी ऐवजी आता 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एनटीएतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने निकाल 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.            

एनटीएतर्फे देशभरातील 292 शहरांमध्ये 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत नेट परीक्षा घेण्यात आली. 9 लाख 45 हजार 918 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एनटीए तर्फे 10 जानेवारी रोजी नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मिचौंग वादळामुळे चेन्नई व आंध्र प्रदेशातील उमेदवारांना विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे, असे एनटीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.