पॉर्न साईटवरील व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांचे शाळेत अश्लील वर्तन

सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट वायरल झाली.

पॉर्न साईटवरील व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांचे शाळेत अश्लील वर्तन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे शहरातील सेनापती बापट रस्त्याजवळील एका नामांकित शाळेमध्ये चार-पाच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या एका विद्यार्थ्याबरोबर अत्यंत अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच समोर आली. सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट वायरल झाली आहे. त्यामुळे पालकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आला आहे. मोबाईलवर काय पहावे हे विद्यार्थ्यांच्या हातात नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील नको ती माहिती आणि व्हिडिओ विद्यार्थी पाहत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांनी पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ पाहून त्याचे अनुकरण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. एका सजग महिलेने याबाबतची पोस्ट फेसबुकवर लिहिली होती.त्यावर अनेक पालकांनी प्रतिक्रियाही दिल्या. त्याचप्रमाणे शाळेने या घटनेची दखल घेऊन संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याची माहितीही समोर आली. 

शाळा प्रशासनाने अश्लील प्रकारचे वर्तन करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी सस्पेंड केले आहे.हे विद्यार्थी सज्ञान नाहीत. तसेच संबंधित शाळेचे नाव प्रसिद्ध करणे ही योग्य नाही. मात्र, घडलेली घटना अत्यंत गंभीर व दुर्दैवी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर पालक काय संस्कार करतात, याचा उद्धार त्यांच्या वर्तनातून शाळेसारख्या ठिकाणी दिसून येत असेल तर संबंधित बालकाला मान खाली घालावी लागणार आहे. त्यामुळे अशी वेळ येण्यापूर्वीच पालकांनी आपल्या मुलांना वेळीच सुधारायला हवे,असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
------------------