कोटा शहर पुन्हा हदरले! विद्यार्थी आत्महत्येनंतर बेपत्ता होण्याचे सत्र सुरुच .. पालकांमध्ये भिती  

यापूर्वी बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसताना आता आणखी एक विद्यार्थी बेपत्ता आहे

कोटा शहर पुन्हा हदरले! विद्यार्थी आत्महत्येनंतर बेपत्ता  होण्याचे सत्र सुरुच .. पालकांमध्ये  भिती  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षांची (Competitive Examination) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आमहत्येसाठी (Murder of students) चर्चेत आलेल्या राजस्थान राज्यात आता विद्यार्थी बेपत्ता (Student missing) होण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे कोटा शहर पुन्हा हदरले आहे. कोटा येथे राहून NEET ची तयारी करणारा आणखी एक कोचिंग घेणारा विद्यार्थी (Coaching student) बेपत्ता झाला आहे. विद्यार्थी कोचिंगसाठी वसतिगृहातून बाहेर पडला होता, तो पुन्हा परतलाच नाही. मागील सात दिवसांत विद्यार्थी बेपत्ता होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसताना आता आणखी एक विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बेपत्ता विद्यार्थी युवराज हा सीकर जिल्ह्यातील नीम येथील रहिवासी आहे. तो कोटा येथील ट्रान्सपोर्ट नगर येथील वसतिगृहात राहून खासगी कोचिंगसह NEET ची तयारी करत आहे. युवराज शनिवारी संध्याकाळी उशिरा  बेपत्ता झाल्याचे उघड झाले. तो सकाळी कोचिंगसाठी वसतिगृहातून बाहेर पडला होता. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत वसतीगृहात पोहोचलाच नाही, त्यानंतर शोधाशोध करण्यात आली. त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला असता हे लोकेशन वसतिगृह परिसरात दिसून आले. वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या खोलीची झडती घेतल्यावर पोलिसांना एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्ड पडलेले आढळले. याआधी  मध्य प्रदेशातील राजगड येथील रचित सोंढिया गेल्या रविवारी बेपत्ता झाला होता, तो अद्याप सापडलेला नाही. 

मागील आठवड्यात झारखंडचा रहिवासी शुभ कुमार चौधरी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्या आधी यूपी मुरादाबादचे रहिवासी मोहम्मद जैद यांनी 24 जानेवारीला कोटा येथे आत्महत्या केली. तो NEET ची तयारी करत होता. तर याआधी 1 जानेवारी रोजी निहारिका नावाच्या विद्यार्थिनीनेही आत्महत्या केली होती. 2024 या वर्षभरात कोटा परिसरात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2023 वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कोटा शहरामध्ये सुमारे 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे विद्यार्थी आत्महत्या आणि बेपत्ता होण्याच्या या सत्रामुळे कोटा पुन्हा हदरले असून, पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.