कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.ज्ञानदेव म्हस्के

डॉ.म्हस्के हे सातारा येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.ज्ञानदेव म्हस्के

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू (Karmaveer Bhaurao Patil University Vice-Chancellor)पदी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांनी गुरूवारी डॉ.ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के (Dr. Dnyandev Kundalik Mhaske)यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी (Vice-Chancellor)नियुक्ती केली आहे. डॉ.म्हस्के हे सातारा येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य (Dr. Principal of Dhananjaya Rao Gadgil College of Commerce)आहेत.त्यांची नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी झाली आहे.

सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी टी शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२ च्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या मा. राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील,पुण्यातील भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे 'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते.समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.

डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच. डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.