NEET UG : अखेर NTA कडून पुनर्परीक्षेची नोटीस जारी

NEET UG परीक्षेत ग्रेस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेची नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे.

NEET UG : अखेर NTA कडून पुनर्परीक्षेची नोटीस जारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) एका मोठ्या वादानंतर अखेर NEET UG परीक्षेत ग्रेस गुण (Grace Marks) मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (students) पुनर्परीक्षेची नोटीस (re-exam notice) प्रसिध्द केली आहे. ग्रेस गुण मिळालेल्या सर्व 1 हजार 563 NEET UG उमेदवारांची पुनर्परीक्षा 23 जून 2024 रोजी घेतली जाईल.  सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) सुनावणीनंतर एनटीएने ही नोटीस प्रसिध्द केली आहे.

NTA च्या उच्चाधिकार समितीच्या अहवालावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर सर्व 1 हजार 563 विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ग्रेस गुण मागे घेण्यात आले आहेत. सर्व 1 हजार 563 उमेदवारांची पुनर्परीक्षा येत्या 23 जून 2024 रोजी होणार आहे." असे एनटीएने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे. 

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (National Board of Examinations) पुढे सांगितले की, लवकरच एक सार्वजनिक सूचना प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच  1 हजार 563 उमेदवारांना अधिकृत सूचना मिळाल्याची खात्री करण्यासाठी ई-मेलद्वारे संपर्क देखील करणार आहे.

23 जून रोजी होणार परीक्षा

सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारने(Central government) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 1 हजार 563 उमेदवारांना ग्रेस गुण देण्यात आले होते, ज्यांचे स्कोअरकार्ड (scorecard) रद्द केले जातील. या उमेदवारांना पुन्हा परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. 30 जून रोजी या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.