चौथीच्या विद्यार्थ्यांनीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाली एकत्रित पुस्तक वाचायला मजा येत नाही

एका विषयासाठी चार पुस्तके शोधावे लागतात, त्यामुळे मला हे पुस्तक वाचायला मजा येत नाही.

चौथीच्या विद्यार्थ्यांनीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाली एकत्रित पुस्तक वाचायला मजा येत नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एका विषयासाठी चार पुस्तके शोधावे लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तके (New Educaction Policy) छान होते. त्यामध्ये एका विषायाचे सर्व एकत्र असायचे. त्यामुळे मला हे पुस्तक वाचायला मजा येत नाही. सर्व अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहित (CM Latter) राहायला तुम्ही कुठे असता? असे पत्र चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीने थेट मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) लिहिले आहे.  

तिमसा सय्यद असे या मुलीचे नाव असून चंद्रपूर जिल्ह्यातील जि. प. प्रा. शाळा गोंडगुडा इयत्ता ४ थी च्या वर्गात ती शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे वंचित घटकांसाठी वेगळ्या वाटेने आणि प्रयोगशील पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षिका वैशाली गेडाम यांच्या शाळेतील ही विद्यार्थीनी आहे. त्यामुळे तिच्या या पत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्याचा निर्यण या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आला. प्रत्येक तिमाहित केवळ एकत्रित पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागत आहे. या अभियानाला वर्षही उलटत नाही तोच आता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

शिक्षण विभागाकडून बालभारती एकात्मिक भाग एक ते चार अशा चार भागात सर्व विषयांची एकत्रित चार पुस्तके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक तिमाहीत अनुक्रमे त्यातील एक पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागत आहे. मात्र, यावर आता एक चिमुकलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मला हे काहीच समजत नसून मला ते आवडले नाही असे पत्रात नमुद केले आहे.