शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली ; पवित्र पोर्टलवर 22 हजार जागांच्या जाहिराती सोमवारी होणार प्रसिद्ध

तब्बल 16  हजार 500 जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केल्या जाणार आहेत.

शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली ; पवित्र पोर्टलवर  22 हजार जागांच्या जाहिराती सोमवारी होणार प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती (Teacher recruitment)प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी (दि ५) दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना 21 हजार 978 जागांच्या जाहिराती पाहण्यास उपलब्ध होणार आहेत.असे शिक्षण विभागातील विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेस खूप विलंब झाला आहे. शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी इंग्रजी माध्यम वाद , केंद्र शाळेवर साधनव्यक्ती नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती. अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व सुमारे १ हजार खाजगी शिक्षण संस्थांमधील २१ हजार ९७८ जागांसाठीच्या जाहिराती सोमवारी प्रसिद्ध होणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या 70 टक्के जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

हेही वाचा: मागासवर्गीय विद्यार्थांना महाविद्यालयात शिक्षणाबरोबर पैसे कमावण्याची संधी

रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे ८०० जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही तर खाजगी शिक्षण संस्थेच्या जागांवर सुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तब्बल 16  हजार 500 जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केल्या जाणार आहेत. उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील,असे विश्वासीय सूत्रांनी सांगितले.