नोकऱ्या मिळत नसतील तर या पदव्यांचा काय उपयोग... उच्च शिक्षण तरुणाची सुसाईड नोट लिहित आत्महत्या 

चांगले मार्क आणि उच्च शिक्षणाची पदवी मिळवून सुद्धा जर नोकरी मिळत नसेल तर, अशा निरशेला बळी पडत एका 24 वर्षांच्या तरुणाने सुसाईट नोट लिहून आपले आयुष्य संपवले आहे. 

नोकऱ्या मिळत नसतील तर या पदव्यांचा काय उपयोग... उच्च शिक्षण तरुणाची सुसाईड नोट लिहित आत्महत्या 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चांगला अभ्यास केला, तर भविष्य उज्वल असेल, चांगली नोकरी मिळेल, हाच आशावाद मनात ठेऊन अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत असतात. पण चांगला अभ्यास करून  चांगले गुण घेत उच्च शिक्षणाची पदवी मिळवून सुद्धा जर नोकरी मिळत नाही, या निराशेतून एका तरुणाने आत्महत्या (Youth suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश येथिल ब्रिजेश पाल (Brijesh Pal) या उच्च शिक्षित 24 वर्षीय तरुणाने सुसाईट नोट (susite note) लिहून आपले आयुष्य (suicide) संपवले आहे. 

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे एका २४ वर्षीय तरुणाने ‘नोकरी मिळत नसल्याने’ आत्महत्या केली. तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो नुकताच पोलिस भरती परीक्षेला बसला होता. तो पोलिस ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहायचा. उच्च शिक्षण घेऊन काहीच हाती लागत नसल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कन्नौज येथील रहिवासी असलेल्या ब्रिजेश पाल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहिली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की त्याने आपल्या सर्व डिग्री जळाल्या आहेत. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, "जर पदव्या रोजगार देत नसतील मग त्यांचा काय उपयोग. मी माझे अर्धे आयुष्य अभ्यासात घालवले आहे."

तरुणाने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही, नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेवरून सध्या राजकारण ही चांगलेच तापले आहे. या प्रकरणासाठी विरोधक भाजपवर निशाणा साधत आहेत. मात्र, यामध्ये एक उच्च शिक्षित तरुणाचा बळी गेला आहे.