RTE Admission : पालकांना दिलासा,आरटीईचा अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

पालकांना 4 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत पाल्याचा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही.

RTE Admission : पालकांना दिलासा,आरटीईचा अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

RTE  Admission: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई  कायद्याअंतर्गत आरटीई  प्रवेश प्रक्रिया (RTE Admission Process)राबवली जात असून पालकांना आपल्या पाल्याचा आरटीई  प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी येत्या 4 जून पर्यंत मुदतवाढ (Extension of time for submission of RTE application)देण्यात आली आहे. पालकांना 4 जून नंतर कोणत्याही परिस्थितीत पाल्याचा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे पत्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (State Director of Primary Education Sharad Gosavi)यांनी प्रसिद्ध केले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारित आरटीई प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. पालकांना आपल्या पाल्याचा आरटीई  प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अजूनही काही पालक आरटीई प्रवेशाचा अर्ज भरू शकले नव्हते. दरवर्षी सुमारे 3 लाख पालक आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरतात. पालकांना 31 मे रोजी दुपारी चार वाजेपर्यंत दोन लाख 24 हजार 671 विद्यार्थ्यानी आरटीई प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरले होते. राज्यातील 9 हजार 207 शाळांमधील आरटीईच्या 1 लाख 5 हजार 116 जागांसाठी ऑनालाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.

आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी काही पालकांकडून केली जात होती. काही कारणास्तव अनेक पालक आरटीई प्रवेशाचा अर्ज भरू शकले नाही. आता या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज ४ जून पर्यंत भारता येणार आहे.

आरटीई प्रवेश अर्जाचे जिल्हा निहाय आकडेवारी

District RTE Schools RTE Vacancy Total Applications
Ahmadnagar 357 3023 6840
Akola 197 2014 4590
Amravati 232 2396 6238
Aurangabad 574 4451 13947
Bhandara 90 763 1836
Bid 249 2149 5298
Buldana 234 2581 4834
Chandrapur 199 1516 2809
Dhule 105 1137 2693
Gadchiroli 66 484 795
Gondiya 132 903 2793
Hingoli 114 805 1602
Jalgaon 283 3033 7197
Jalna 299 1920 4589
Kolhapur 325 3032 3521
Latur 215 1865 5259
Mumbai 258 4489 8866
Mumbai 70 1455 --"--
Nagpur 655 6920 19238
Nanded 267 2601 8244
Nandurbar 54 419 766
Nashik 428 5271 13633
Osmanabad 122 1013 2145
Palghar 265 4773 3427
Parbhani 206 1564 2799
Pune 970 17714 45296
Raigarh 264 4008 6884
Ratnagiri 97 812 722
Sangli 233 1901 2194
Satara 222 1826 3299
Sindhudurg 45 293 141
Solapur 291 2464 4813
Thane 643 11377 18243
Wardha 126 1215 2824
Washim 109 953 1863
Yavatmal 211 1976 4433
Total 9207 105116 224671