CBSE दहावी, बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ 

विद्यार्थी  येत्या  १८ ऑक्टोबरपर्यंत नियमीत शूलकासह अर्ज  जमा करू शकतील. तर येत्या १९  ते २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

CBSE दहावी, बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने  (CBSE)  दहावी  आणि बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज  भरण्यास मुदतवाढ दिली आली आहे. सीबीएसईने उमेदवारांकडून आलेल्या विविध निवेदनांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा : शिक्षण डार्विन, आइनस्टाईन सिद्धांताला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

परीक्षा अर्ज भरण्याच्या सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थी  येत्या  १८ ऑक्टोबरपर्यंत नियमीत शूलकासह अर्ज  जमा करू शकतील. तर येत्या १९  ते २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.  या संदर्भात  CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर परिपत्रक प्रसिध्द केले आहे.

दरम्यान,  दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कोणत्याही बाह्य परीक्षकाची नियुक्ती केली जाणार नाही, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही खासगी उत्तरपत्रिका दिली जाणार नाही, सर्व व्यवस्था शाळेकडूनच केली जाईल. इयत्ता  बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्पाच्या मूल्यमापनासाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली जाईल. यासोबतच अंतर्गत परीक्षकही असतील. शाळांना केवळ परीक्षेचे अचूक गुण अपलोड करण्यास सांगितले आहे. गुण एकदा अपलोड केल्यानंतर ते बदलता येणार नाहीत. प्रात्यक्षिक परीक्षा देताना प्रत्येक गटातील मुलांची छायाचित्रेही बोर्डाला पाठवावी लागणार आहेत. यामध्ये परीक्षकासह मुलांचे चेहरेही दिसणे आवश्यक आहे, असेही निर्देश सीबीएसईकडून देण्यात आले आहेत.