तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा विद्यापीठात सुरू झाले NSS चे युनिट

विद्यार्थ्यांना एनएसएसमध्ये सहभागी होण्याची संधी सुमारे दहा वर्षांपासून बंद होती.विद्यापीठाने या वर्षी पुन्हा एनएसएस युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला

तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा विद्यापीठात सुरू झाले NSS चे युनिट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) तब्बल दहा वर्षांनंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे (National service Scheme) युनिट सुरू होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाबरोबरच विद्यापीठातील विविध विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एनएसएसच्या (NSS ) माध्यमातून विविध उपक्रमात भाग घेता येणार आहे. येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना एनएसएसमध्ये (NSS ) सहभागी होण्यासाठी अर्ज करता येणार आहे. सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांबरोबरच व्यक्तिमत्व विकास व कौशल्य शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा : डीईएस पुणे विद्यापीठाचा रविवारी शुभारंभ

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना एनएसएसच्या माध्यमातून विविध उपक्रमात व कार्यक्रमात सहभागी होता येते.मात्र, विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एनएसएसमध्ये सहभागी होण्याची संधी सुमारे दहा वर्षांपासून बंद होती.विद्यापीठाने या वर्षी पुन्हा एनएसएस युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी मान्यता दिली आहे.त्यानुसार सध्या विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध विभागातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.

विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सदानंद भोसले म्हणाले, विद्यापीठाच्या युनिटमध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून आत्तापर्यंत 72 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुध्दा अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमात सहभागी होता यावे,या उद्देशाने सुमारे दहा वर्षानंतर पुन्हा एनएसएस युनिट सुरू केले आहे.