शिक्षिकेने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले; व्हिडिओ व्हारल; पालकांची पोलिसांकडे तक्रार

वर्गातीलच एका विद्यार्थ्याने शिक्षिकेकडून केल्या जात असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शूट केला.

शिक्षिकेने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले; व्हिडिओ व्हारल; पालकांची पोलिसांकडे तक्रार

पुण्यातील नुमवि शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण(Numavi school teacher beats student)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video viral on social media)झाला असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शिक्षिकेविरोधात विश्रामबाग पोलीसांकडे तक्रार केले आहे. तसेच शिक्षिकेला मागणी केली आहे.

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकित शाळेमध्ये शिक्षिकेने वर्गात मस्ती करत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून लाथाबुक्क्यांनी तुडवल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. वर्गातीलच एका विद्यार्थ्याने शिक्षिकेकडून केल्या जात असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शूट केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आपल्या मुलाला अशा पध्दतीने मारहाण केल्याचे पाहून पालकांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला.पूजा केदारी असे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. 

हेही वाचा : आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुण्यातील 53 शाळांचा नकार; विद्यार्थी नोंदणी 4-5 दिवसात सुरू होण्याची शक्यता

वर्गात विद्यार्थ्यांबरोबर घोळका करून बसणारा विद्यार्थी खोड्या करत होता शिक्षिकेकडून त्याला वॉर्निंग दिल्यानंतरही तो शांत बसला नाही. शिक्षिकेने त्याला छडी मारली नाही किंवा इतर कोणती वेगळी शिक्षा केली नाही तर त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरला. परिणामी पालकांनी शाळेकडे व पोलिसांकडे शिक्षकेची तक्रार केली. शाळा प्रशासनाकडून संबंधित शिक्षिकेवर कारवाई केली जात असल्याचे बोलले जात आहे.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.instagram.com/reel/C5qTu_kud9-/