मोठी बातमी : महसूलच्या अधिकाऱ्यांची शिक्षण विभागात उच्च पदांवर नियुक्ती; चर्चांना आले उधाण

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये तर्कवितर्क लढविले जात असून चर्चांना उधाण आले आहे. तसेच नाराजीचा सूरही उमटू लागला आहे.

मोठी बातमी : महसूलच्या अधिकाऱ्यांची शिक्षण विभागात उच्च पदांवर नियुक्ती; चर्चांना आले उधाण
Deepak Kesarkar and Radhakrishna Vikhe Patil

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागातील (School Education department) काही महत्वाच्या उच्च पदांवर महसूल विभागातील (Revenue Departemnt) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये तर्कवितर्क लढविले जात असून चर्चांना उधाण आले आहे. तसेच नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. या नियुक्त्या प्रतिनियुक्तीवर असल्या तरी अनेक वर्ष हे अधिकारी शिक्षण विभागातच राहून इतर अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला फटका बसण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

शालेय शिक्षण विभागाने नऊ अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा आदेश काढला आहे. विभागाच्या क्षेत्रीय आस्थापनेवारील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक पदावर प्रथमतः १ वर्षासाठी किंवा सदर पदावर नियमित अधिकारी नियुक्त होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत असल्याचे विभागाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : MPSC Exam : गोपनीय कामांसाठी मिळेनात विषयतज्ज्ञ; सरकारने थेट आदेश काढूनच ठणकावले

संबंधित अधिकारी हे ज्या तारखेला प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होतील त्या तारखेपासून त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवेचा प्रारंभ होईल आणि ज्या तारखेला ते आपल्या मूळ शासकीय पदाचा कार्यभार पुन्हा स्विकारतील त्या तारखेला त्यांची प्रतिनियुक्तीवरील सेवा समाप्त होईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी (कंसात प्रतिनियुक्तीने नियुक्ती दिलेले पद) –

. दिलीप ज्ञानदेव जगदाळे, अप्पर जिल्हाधिकारी (सहसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे)

२. डॉ. श्रीनिवास पुंडलिकराव कोतवाल, उप सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (सह आयुक्त (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक)

३. विजय कृष्णाजी पोवार (दिव्यांग), विशेष कार्य अधिकारी, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ, मुंबई (विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक)

४. मंजुषा मिसकर, अप्पर जिल्हाधिकारी (विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे)

५. डॉ. उदय आप्पासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक (विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर)

६. संतोष अशोक हराळे, सहा. आयुक्त (चौकशी), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे (शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे)

७. कमलाकर रणदिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. भंडारा (आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे)

८. प्रशांत शिर्के, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली (शिक्षण सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे)

९. सुरज रोहीदास वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी (विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2