पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका (पाॅलिटेक्निक) या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) करिता अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका (पाॅलिटेक्निक) या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी येत्या ९ जुलैपर्यंत मुदतवाढ (Extension of time for admission application registration) देण्यात आली आहे. याआधी देण्यात आलेली मुदत २५ जून रोजी संपुष्टात आल्याने आता ९ जुलै पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. 

राज्यात ३९० संस्थांत सुमारे 1 लाख ५ हजार प्रवेश क्षमता आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत संकेतस्थळ dte.maharashtra.gov.in  वर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. खुल्या गटासाठी प्रवेश अर्जाची रक्कम चारशे रुपये तर राखीव प्रवर्गाला तीनशे रुपये आहे. सर्व शासकीय, अनुदानित व खासगी पॉलिटेक्निक अशी प्रवेशासाठी एकूण ३१६ अर्ज सुविधा केंद्र आहेत.

पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी २९ मे पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत या प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल १ लाख २७ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली आहे. तर १ लाख ४ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केले आहेत. राज्यात ३९० संस्थांत सुमारे १ लाख ५ हजार प्रवेश क्षमता आहे. प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या तीन फेऱ्या घेण्यात येणार आहेत.