CBSE दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येत्या १५ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू 

इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत

CBSE दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येत्या १५ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2024 चे  वेळापत्रक जाहीर (10th and 12th board exam 2024 time table announced) केले आहे. इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. येत्या १० एप्रिलपर्यंत दहावीच्या चालणार आहेत. सुमारे ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी cbse.gov.in  या  अधिकृत वेबसाइट वरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

CBSE बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीच्या महत्त्वाच्या विषयांचे वेळापत्रक पाहिल्यास, हिंदीची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीला, इंग्रजीची परीक्षा २६ फेब्रुवारीला आणि सामाजिक शास्त्राची परीक्षा ७ मार्च २०२४ रोजी होणार आहे. . यानंतर ११ मार्चला गणिताचा आणि १३ मार्चला आयटीचा पेपर होणार आहे.
१२वीच्या इतर परीक्षा वेगवेगळ्या तारखांना होणार असून परीक्षा २ एप्रिल २०२४ रोजी संपतील.

असे आहे १२ वी चे वेळापत्रक 

  * उद्योजकतेसह इतर विषयांची परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतली जाईल.

* जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आणि इतर विषयांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतल्या जातील. ही परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे.


* १७ फेब्रुवारी  रोजी अभियांत्रिकी ग्राफिक्स, कथकली नृत्य, फलोत्पादन, डेटा सायन्स आणि इतर विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील.

* हिंदी इलेक्टिव्ह आणि हिंदी कोअर परीक्षा १९ फेब्रुवारी  रोजी घेण्यात येतील.

* फूड प्रोडक्शन, डिझाइन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची परीक्षा २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

* हिंदुस्थानी संगीतासह इतर विषयांची परीक्षा २१ फेब्रुवारी  रोजी आणि इंग्रजी कोरची परीक्षा २२ फेब्रुवारी  रोजी होणार आहे.

* २३ फेब्रुवारी  रोजी रिटेल आणि इतर २४ फेब्रुवारी  टायपोग्राफीची परीक्षा होणार आहे.

* ४ मार्च  रोजी भौतिकशास्त्र विषयाचा आणि ९ मार्च  रोजी गणित विषयाचा पेपर असेल.